जगभरात निसर्गचक्रात मोठे बदल घडत आहेत. हवामान बदलाचा पृथ्वीच्या वातावरणावर मोठाच परिणाम होतो आहे. प्रदूषण, मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, विषारी वायूंची वातावरणातील वाढती पातळी यासारख्या कारणा मुळे पर्यावरणावर मोठे घातक परिणाम होत आहेत.
अमेरिकेतल्या संशोधना नुसार येणाऱ्या २० वर्षात जगभरात महाभयंकर पूर येणार आहेत.हे पूर मुख्यत्वे करून अमेरिका, भारत, आफ्रिका आणि मध्य युरोपात येणार आहेत. त्यातून मोठीच आपत्ती मानवजातीवर येणार आहे. सध्या येणारे पूरसुद्धा प्रचंड विध्वंसक आहेत. यावरून भविष्यात येणाऱ्या महा प्रलयकारी पूरांचा आपल्याला अंदाज येईल.जागतिक तापमान वाढीचा दर २ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यात य़श आलं तरच पर्यावरणातले बदल आटोक्यात येणार आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews